'गॅस टंचाई' जळाऊ लाकडांची मागणी वाढली

11 Mar 2026 12:07:42
मुंबई
Maharashtra gas shortage मध्यपूर्वेत सुरू झालेल्या इराण-इस्रायल युद्धाने संपूर्ण जगभरात गोंधळ उडाला आहे, त्याचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रालाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी बिघडली असून, एलपीजी गॅसचा पुरवठा अडचणीत आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसह राज्यातील अनेक भागांत नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि मेस संचालक यांना गॅसच्या टंचाईचा फटका बसला आहे.
 

Iran-Israel war impact India, Maharashtra gas shortage LPG cylinder supply disruption, 
युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलेंडरचे वितरण निर्बंधित झाले असून, अनेकांनी जळाऊ लाकडांकडे झुकाव केला आहे. रत्नागिरीसह इतर शहरांमध्ये सॉ मिलमधील जळाऊ लाकडांची मागणी वाढली असून सध्या दर प्रति किलो चार रुपये तर भुस्याचा दर तीन रुपये आहे. बेकरी, हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडांची मागणी होऊ लागली आहे. काही कंपन्यांनी देखील सॉ मिलमधील जळाऊ लाकडांची मागणी केली आहे, त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे.युद्धाचा परिणाम कोळशावरही दिसून येत आहे. सध्या कोळशाचे भाव प्रति किलो चाळीस रुपये आहेत आणि हॉटेल, ढाबा व्यवसायिक यांच्याकडून कोळशाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लोक कोळशाचा पर्याय जास्त वापरण्यास सुरुवात करू शकतात.
सोलापूरमध्येही गॅसची टंचाई Maharashtra gas shortage स्पष्टपणे जाणवते. रामवाडी परिसरातील गॅस गोदामासमोर नागरिकांची लांब रांगे लागल्याचे चित्र दिसले. युद्धामुळे गॅस मिळेल की नाही, याची भीती नागरिकांच्या मनात असल्यामुळे अनेकांनी गॅस तुटवड्यापूर्वीच बुक करून साठवण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन बुकिंग सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड आल्याने नागरिकांना थेट एजन्सीत जावे लागले.गॅस गोदामातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सांगितले की, टाक्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गर्दी करण्याची गरज नाही. तरीही नागरिक थेट ऑफिसमध्ये येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात ऊर्जा पुरवठ्यातून होणाऱ्या या अडचणी नागरिकांसाठी मोठा फटका ठरत आहे, आणि घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी पर्यायी उपाय शोधणे आता गरजेचे ठरले आहे.
Powered By Sangraha 9.0