न्यायासाठी आमरण उपोषणाला प्रारंभ !

11 Mar 2026 18:54:13
मानोरा,
Manora hunger strike, आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेमध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन व अनियमित्ता झाल्याबद्दल चौकशी करण्यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही न्याय न मिळाल्याने अन्यायग्रस्त उमेदवारांनी तहसील कचेरीवर ११ मार्च पासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
 

Manora hunger strike, 
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मानोरा तालुयातील उमेदवारांच्या मुलाखती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या होत्या. मुलाखती दरम्यान उमेदवारांना अधिक गूण प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली होती. तरी देखील डावलण्यात आले आहे. एकट्या उमेदवाराने मुलाखत देऊनही डावलण्यात आलेले आहे. यासह शासनाचे नियम बाजूला सारून निवड प्रक्रियेत विविध चुका करण्यात आले आहे. सदरील मुलाखत प्रक्रिया तहसील कार्यालय मानोरा येथे पार पडल्या असून, सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज, सबंधित कागदपत्राची, संपूर्ण प्रक्रियेची सखोल व निष्पक्ष चौकशी चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व अन्याय झालेल्या अर्जदारांना न्याय द्यावा, यासाठी अन्यायग्रस्त उमेदवारांनी आमरण उपोषणाला तहसील कचेरीवर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. उपोषण आंदोलनाला प्रफुल्ल दुबे, प्रशांत धोत्रे, रामेश्वर जयस्वाल, जयकुमार राठोड आदीसह अन्यायग्रस्त उमेदवार बसले आहेत.
Powered By Sangraha 9.0