महिला पोलिसांचा सन्मान

11 Mar 2026 18:43:44
नागपूर,
Morya Foundation दिघोरी येथील योगेश्वर नगर येथे मोरया फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा त्यांच्या धाडस, समर्पण व सेवाभावासाठी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका प्रभाग २८ सौ. मंगला गवरे आणि मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी चौहान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी वाठोडा पोलिस स्टेशनमधील महिला पोलिसांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
 
mhila
 
 
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागतगीत सादर करण्यात आले. नगरसेविका मंगला गवरे यांनी मोरया फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फाउंडेशनच्या दिघोरी ग्रुपमधील महिलांनी नृत्य व गीत सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार केला.Morya Foundation उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी चौहान यांनी केले, सूत्रसंचालन भाग्यश्री यांनी केले तर आभार संध्या कटमुसरे यांनी मानले.
सौजन्य : रजनी चौहान,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0