‘तारक मेहता’च्या बबीताजी नाराज

भारतीय पर्यटकांच्या असभ्य वर्तनावर संताप व्यक्त

    दिनांक :11-Mar-2026
Total Views |
मुंबई,

Munmun Dutta ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेतील बबीताजीच्या भूमिकेमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta सध्या सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. लोकप्रिय पर्यटन स्थळी काही भारतीय पर्यटकांचे असभ्य आणि लाजिरवाणे वर्तन पाहून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
 

Munmun Dutta Bhabhiji role, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actress, 
मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडीओ क्लिप शेअर केले आहेत ज्यात ती निराशा व्यक्त करते. या व्हिडीओंमध्ये काही पर्यटक पार्यटन स्थळी अशा प्रकारचे वर्तन करताना दिसतात, जे पाहून कोणालाही लाज वाटेल. काही पुरुष अर्धनग्न फिरत आहेत, तर काही समुद्रात कार चालवत आहेत. शिवाय, काहीजण नैसर्गिक स्थळे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असल्याचेही Munmun Dutta दिसत आहे.मुनमुन दत्ता स्वतः पर्यावरणाची कट्टर समर्थक असून तिला प्राण्यांवरही प्रेम आहे. नुकताच तिने तिच्या सकाळच्या दिनचर्येची एक गोड झलक शेअर केली आणि नुकत्याच रेस्क्यू केलेल्या मांजरीच्या पिल्लाची चाहत्यांना ओळख करून दिली. सोशल मीडियावर ती कायम प्राण्यांबद्दल फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते आणि चाहत्यांशी संपर्कात राहते.
अभिनेत्रीने या पोस्टद्वारे पर्यटन स्थळांवरील असभ्य वर्तन आणि पर्यावरणीय हानीबाबत जनतेला जागरूक करायचा प्रयत्न केला आहे. तिच्या चाहत्यांनीही तिच्या पोस्टवर प्रचंड प्रतिसाद दिला असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.या पोस्टमुळे मुनमुन दत्ता फक्त मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री म्हणूनच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय बाबतीत जागरूक व्यक्ती म्हणूनही चर्चेत आली आहे.