नालवाडी येथे विशाल हिंदू संमेलन यशस्वी

11 Mar 2026 20:14:05
वर्धा, 
nalwadi-hindu-conference-a-success : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने नालवाडी वॉर्ड ६ येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख अतिथी म्हणून बबन चौहाण उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर बोरघरे होते. तर प्रमुख वता म्हणून ग्रंथालय भारतीचे संघटनमंत्री राजेश राठोड यांची उपस्थिती होती.
 
 
kj
 
 
 
यावेळी राजेश राठोड यांनी समाजात वावरताना प्रत्येकाने कोणत्या मूल्यांचे पालन केले पाहिजे, तसेच कुटुंब व्यवस्थेमध्ये लहान मुलांना योग्य संस्कार देण्यासाठी पालकांनी वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी पंच परिवर्तन या संकल्पनेचे विवेचन केले. पर्यावरण संरक्षण, कुटुंब व्यवस्था बळकट करणे, स्व-आधारित जीवनशैली, स्वदेशीचा स्वीकार या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. संचालन नीलकंठ पिसे यांनी केले. आभार धनंजय भट्ट यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0