पोरवाल महाविद्यालयातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

11 Mar 2026 15:28:50
नागपूर,(कामठी)
National Council सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी यांच्या पुढाकाराने "एआय-आयपीआर इंटरफेसमध्ये जीवन विज्ञान आणि पदार्थ विज्ञानातील सीमा"” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ६ व ७ मार्चला नागपूर येथील हॉटेल ओरियन्ट ग्रांट येथे पार पडली.
 
agr
 
 
या परिषदेत जीवन विज्ञान, मटेरियल सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बौद्धिक संपदा हक्क (IPR) या विषयांवरील संशोधन प्रवाहांवर चर्चा करण्यात आली. उद्घाटन मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते झाले. National Council  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकर धोंडगे, डॉ. अखिलेश कुमार पांडे, डॉ. विक्रमसिंह पचलोरे, डॉ. जे. व्ही. दडवे, प्राचार्य डॉ. स्वप्नील दाहात आदी उपस्थित होते.परिषदेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच पोस्टर सादरीकरणातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. या परिषदेस सुमारे २६० प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. राकेश ठाकरे, डॉ. आलोक रॉय, डॉ. अशोक दवंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
 
सौजन्य:प्रा. डॉ सुधीर अग्रवाल,संपर्क मित्र
 
 
Powered By Sangraha 9.0