राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्काराने डॉ. अंजली गवार्ले सन्मानित

11 Mar 2026 21:34:28
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
anjali-gawarle : जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात नॅशनल वूमन पार्लमेंट 2026 या कार्यक्रमात विदर्भातील यवतमाळ शहरातील प्रसिद्ध मूळव्याध, फिशर व भगंदर तज्ञ, 15 वर्षांपासून आरोग्य सेवा देणाèया एमएस शल्य चिकित्सक डॉ. अंजली आशिष गवार्ले यांना राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले.
 

k 
 
इंडिया बुक रेकॉर्डनुसार पाइल्स सर्जरी करणाèया विदर्भातील त्या एकमेव स्त्री शल्य चिकित्सक आहेत. त्याकरिता महाराष्ट्र दिन सोहळ्यात त्यांना हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाèया वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक सेवेतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
 
डॉ. अंजली गवार्ले उदयपूर, हैद्राबाद, खजुराहो, कोलकाता, कोइंबतूर, नाशिक यासह इजिप्तमध्ये झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत आयुर्वेदिक वक्ता म्हणून सहभागी झाल्या आहेत. सर्वसामान्य रुग्ण व महिलांसाठी निशुल्क आरोग्य व रोगनिदान शिबिर, अनेक शाळा, महाविद्यालय, गाव, खेडे येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिर, कॅन्सर अवेअरनेस, व्यसन, योग, मानसिक विकार, अंधश्रद्धा या विषयांवरही त्या मार्गदर्शन करतात.
 
 
शासकीय रक्तपेढीसाठी प्रजासत्ताक दिनी महिलांचे रक्तदान शिबिर घेणाèया त्या एकमेव डॉक्टर आहेत. लायन्स, रोटरी, आधार फाऊंडेशन, आरोग्य अभियान, भारत समिती, ‘निमा’च्या त्या सक्रिय सदस्य आहेत. त्याचसोबत ‘अर्शश्रुता सर्जिकल हँडबुक ऑफ सर्जरी आणि आयुर्वेद मॉडर्न व्ह्यू’ या पुस्तकाचे लेखनसुद्धा त्यांनी केले आहे.
 
 
वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असणाèया डॉ. अंजली गवार्ले यांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. याकरिता जागतिक महिला दिनानिमित्त ‘राष्ट्रीय आरोग्यसेवा उत्कृष्टता पुरस्कार 2026’ने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0