हार्दिक पंड्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल

11 Mar 2026 14:27:42
पुणे,
Police complaint against Hardik Pandya टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या मैदानावर झालेल्या सेलिब्रेशनमुळे मोठा वाद उडाला आहे. सलग दुसऱ्या वेळेस वर्ल्डकप जिंकल्यानंतर खेळाडू मैदानात जोरदार आनंद साजरा करत होते. या आनंदोत्सवादरम्यान काही खेळाडूंनी असे वर्तन केले , ज्यामुळे सामाजिक माध्यमांवर टीका होऊ लागली. विशेषतः हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी त्यांच्या प्रेयसींसोबत मैदानात सर्वांसमोर किस केल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले, ज्यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला.
 
 

hardik pandya 
या सेलिब्रेशन दरम्यान, हार्दिक पांड्याने खांद्यावर तिरंगा घेऊन डान्स आणि काही आक्षेपार्य हालचाली केल्या. मात्र, काहींनी त्याचे हे वर्तन तिरंग्याच्या अपमानाचे मानले. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. तक्रार अर्ज एका वकिलाने दिला असून, त्यात म्हटले आहे की "भारतीय खेळाडू कितीही मोठा असला तरी तिरंग्यापेक्षा मोठा नाही; तिरंग्याचा सन्मान राखणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. सोशल मीडियावर व्हिडीओज व्हायरल झाले आहेत, ज्यात दिसते की हार्दिक पांड्या प्रेयसी माहिका शर्मासह खांद्यावर तिरंगा असतानाच मंचावर झोपला होता. या घटनेमुळे अनेक चाहत्यांमध्ये संताप निर्माण झाला.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करतील की नाही, हे पाहावे लागेल.  
Powered By Sangraha 9.0