मुंबई
Poonam Pandey चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री मोठ्या पडद्यावर नाव कमावण्याच्या उद्देशाने पदार्पण करतात. मात्र प्रत्येकालाच अपेक्षित यश मिळत नाही. काही जणी चित्रपटांतून फारसं यश न मिळाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अशाच कारणांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे Poonam Pandey. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती वारंवार चर्चेत येत असते. अलीकडेच तिने स्वतःच्या मृत्यूबाबत पसरलेल्या अफवेमुळे पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.
पूनम पांडे Poonam Pandey हिचं नाव सर्वप्रथम देशभर चर्चेत आलं ते एका वादग्रस्त विधानामुळे. भारताने ICC Cricket World Cup जिंकल्यास आपण न्यूड फोटोशूट करणार असल्याचं तिने जाहीर केलं होतं. या विधानामुळे ती रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आली. मात्र या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि अनेकांनी तिच्या विधानाचा निषेध केला.
यानंतर पूनम पांडेने Poonam Pandey विविध रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमधून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिने नशा Nasha या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र या चित्रपटानंतरही तिला मोठं यश मिळालं नाही. मोठ्या पडद्यावर अपेक्षित यश न मिळालं तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. तिच्या धाडसी पोस्ट आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्व्हायकल कॅन्सरमुळे तिचं निधन झाल्याची माहिती शेअर करण्यात आली. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आणि अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनम पांडे स्वतः समोर येत तिने स्पष्ट केलं की ती जिवंत असून ही बातमी सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेचा भाग होती.
या घटनेनंतर सोशल मीडियावर पूनम पांडेवर टीकेची झोड उठली. अनेकांनी तिच्या या कृतीला असंवेदनशील ठरवत स्वतःच्या मृत्यूचं नाटक करणं हा जनजागृतीचा योग्य मार्ग नसल्याचं म्हटलं. काहींनी मात्र ही कृती केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं मत व्यक्त केलं.वादग्रस्त वक्तव्ये, सोशल मीडियावरील पोस्ट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धी मिळवण्याच्या पद्धती आणि जनजागृतीच्या माध्यमांबाबतही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.सोशल मीडियाला तिचे जुने फोटो व्हिडिओ उपलोड झालेले आहे. आणि परत एकदा ती वादाचा भोवऱ्यात अडकलेली आहे . तिला त्याच कारणामुळे ट्रोल केले जात आहे. भारताने ICC Cricket World Cup २०२६ वर आपला विजय घोषित केला आणि पुनमची आठवण ताजी झाली