नागपूर,
Pratap Nagar Primary School प्रताप नगर प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे तसेच शाळेच्या आगामी उपक्रमांची माहिती देणे हा सभेचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर पहाडे, मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर व मुख्याध्यापक सुरकर उपस्थित होते.Pratap Nagar Primary School विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षकांमध्ये सुसंवाद आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन बोरकर मॅडम यांनी केले तर आभार खोत मॅडम यांनी मानले. सभेला पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य : शंकर पहाडे,संपर्क मित्र