कारागृह गॅसवरून चुलीकडे? हॉटेल व्यवसाय बंदच्या पायरीवर!

11 Mar 2026 21:07:37
वर्धा,
wardha-news : सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम विविध क्षेत्रांप्रमाणेच कॅटरिंग व्यवसायावरही होताना दिसत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेलसह कॅटरिंग व्यवसायालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा कारागृहातील सिलेंडर साठा संपल्याच्या मार्गावर असल्याने तेथे चुलीवर स्वयंपाक करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाले आहे. सिलेंडर २९ दिवसांनंतर मिळणार असल्याची चर्चा असल्याने आपले सिलेंडर आपल्याकडे कसे जपून ठेवता येईल, नवीन सिलेंडर कसे तात्काळ मिळवता येईल याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत.
 
 
 
k
 
 
 
जिल्ह्यात गॅसची टंचाई नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी सिंगल सिलेंडर असणार्‍या ग्राहकांना वणवण भटकावे लागत आहे. नवीन नियम लागू होण्यापूर्वी ज्या सिंगल सिलेंडर असलेल्या ग्राहकांनी बुकिंग केलेले नाही, असे ग्राहकांना गॅससाठी आता २९ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठी अडचण झाल्याने हॉटेल तसेच कॅटर्स व्यावसायिकांची कोंडी सुरू झाली आहे.
 
 
गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार आहे. अनेक व्यावसायिकांकडे सध्या मर्यादित सिलेंडरसाठा असल्याने तो संपल्यानंतर अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत चहा, नाश्ता, जेवण तसेच इतर खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शयता नाकारता येत नाही.
 
 
वाढदिवस, साक्षगंध, विवाह समारंभ तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कॅटरिंग व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळत असतात. मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर लग्नाचे ठोक आहेत, अशा वेळी आधीच ऑर्डर स्वीकारलेल्या कॅटरिंग व्यावसायिकांना स्वयंपाकासाठी आवश्यक गॅस सिलेंडर उपलब्ध करणे कठीण जात आहे. काही व्यावसायिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी अतिरित खर्च करावा लागत आहे.
 
 
व्यावसायिक सिलेंडर संपले : बजाज
 
 
सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होत आहे. आपल्याकडे पुरेसा सिलेंडरचा साठा नसल्याने नवीन सिलेंडर मिळेपर्यंत आपण हॉटेल बंद ठेवावा का असा विचार करतो आहोत. इलेट्रिकर चालणार्‍या शेगड्यांवर जे काही करता येईल ते करावे लागेल. प्रचंड मंदी असल्याने कर्मचार्‍यांचे वेतन काढणे आवश्यक आहेत. इलेट्रिक संसाधनांचा वापर केल्यास लगेच भारनियमानाचा धोकाही संभवतो, असे येथील प्रतिष्ठित हॉटेल व्यवसायिक प्रदीप बजाज यांनी सांगितले. तर सध्यातरली हॉटेल बंद करण्याची वेळ येणार नाही. सरकार काही तरी व्यवस्था करू शकते, असे हॉटेल तंदूरचे मालक मंदार अभ्यंकर यांनी सांगितले.
 
 
 
 
विद्यार्थ्यांच्या मेसचे वांदे
 
 
वर्धा शहरात सेवाग्राम आणि सावंगी येथे वैद्यकीय महाविद्यालय, जय महाकाली, स्व. बापुराव देशमुख, बजाज अभियांत्रिकी, महात्मा गांधी आंतर राष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असुन येथे मेस चालवल्या जाते. येथे दररोज व्यावसायिक सिलेंडरची गरज आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलेंडर देणे बंद झाल्यास या विद्यालयातील मेसचे वांदे झाल्याशिवार राहणार नाहीत.
Powered By Sangraha 9.0