यवतमाळ नगर परिषदेत ‘राडा’

11 Mar 2026 21:27:45
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-municipal-council : नगरसेवक पिंटू बांगर यांच्याकडून बाजार विभागात येऊन बाजार अधीक्षक हरिश जाधव यांना शिवीगाळ केल्याने कर्मचाèयांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत नगर परिषद वाहनतळात कामबंद आंदोलन पुकारले. यापुढे असाच घटना घडत राहिल्यास कायदेशिर कारवाई करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
 

y11March-Kamband 
 
 
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने यवतमाळ नप येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी काही नगरसेवकांकडून वारंवार उद्धट, अवमानकारक व अयोग्य पद्धतीने बोलण्यात येते. तसेच शिवीगाळ करणे तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये अनावश्यक हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढत आहेत.
 
 
यापूर्वीसुद्धा बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता उत्कर्ष टेभुर्णे यांना कार्यालयात उपस्थित असताना एका नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातील कामासंबंधाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांचा सर्व कर्मचाèयांसमोर अपमान केला होता.
 
 
या कामाशी अभियंता उत्कर्ष टेंभुर्णे यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्याशी अवमानकारक भाषेत सार्वजनिक प्रशासनामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाèयांशी अशा प्रकारचे अवमानकारक प्रकार घडत आहेत.
 
 
गुरुवार, 11 मार्च रोजी दुपारी 12.23 वाजता बाजार विभागात येऊन नगरसेवक पिंटू बांगर यांनी बाजार अधीक्षक हरिश जाधव यांना शिवीगाळ केली. याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. तसेच यापुढे कर्मचारी व अधिकाèयांना शिवीगाळ किंवा अरेरावीची भाषा करण्यात आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला.
 
 
यावेळी मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, नागेश कपाटे, राकेश भोयर, हरीश जाधव, उत्कर्ष टेंभुर्णे, अक्षय नवलकर, जयेश लोखंडे हे कर्मचारी उपस्थित होते.
पतीच झाले कारभारी
शासनाच्या नियमानुसार महिला सदस्यांच्या पतींना कामकाजात कोणताही प्रकारे हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, काही महिला सदस्यांचे पती प्रशासनाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात. त्यामुळे असा महिला सदस्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी कर्मचाèयांनी केली आहे.
शिवीगाळ केली नाही
दैनिक वसुलीबाबत विचारणा करण्यासाठी नप कार्यालयात गेलो असता त्या ठिकाणी महिला नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या सांगत होत्या. संबंधित कर्मचारी त्या महिला नगरसेवकांशी अरेरावी करत होता. त्यामुळे मी कर्मचाèयाला महिला सदस्यासोबत अरेरावी का करत आहे, असा जाब विचारला. कोणत्याही पद्धतीची शिवीगाळ केली नाही. माझ्यावरील आरोप सपशेल खोटे आहेत.
पिंटू बांगर, नगरसेवक
Powered By Sangraha 9.0