कायम पट्टे अर्ज स्वीकारण्याची तारीख निश्चित

11 Mar 2026 17:58:16
राळेगाव,
Ralegaon राळेगाव शहर विकास संघर्ष समितीचे वतीने कायम पट्टे, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती व इतर मागण्यांसाठी 9 फेब्रुवारी 26 पासून आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांनी न्याय मानण्यासाठी या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
 

Ralegaon 
तहसीलदार राळेगाव, मुख्याधिकारी न.प. राळेगाव प्रशासन अधिकाèयांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन 15 दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हा कालावधी उलटून गेल्याने आज 10 मार्च रोजी या मागणीचा पाठपुरावा करण्याकरता असंख्य नागरिक, माता-भगिनींनी पाठपुरावा केला, आग्रही व आक्रमक मागणी केली. यावेळी 2 एप्रिल 2026 पासून कायम पट्टे अर्ज स्वीकारून घेण्यास सुरुवात होईल, असे आश्वासन देण्यात आले. या सोबतच इतर मागण्यांबाबतही सकारात्मकता दाखवण्यात आली. राळेगाव शहर विकास संघर्ष समितीने या मागण्या लावून धरल्याने प्रश्न ऐरणीवर आणला.
मंगळवारी संघर्ष Ralegaon समितीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. दिलेले आश्वासन पूर्ण करा अशी मागणी घेऊन असंख्य महिला व नागरिकांनी न.प. वर धडकल्या. मुख्याधिकाèयांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून आता आंदोलनाची गरज पडणार नाही, मार्च एंडिंगची कामे होऊ द्या, एप्रिलच्या 2 तारखेपासून कायम पट्टे अर्ज स्वीकारू, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती व संबंधित सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दादा बादशहा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आठवड्याभरात व्यवस्था करून देऊ असे आश्वासन पाणीपुरवठा सभापती जानराव गिरी यांनी दिले.
 
 
सर्व मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी व्यक्त केली. यावेळी मंगेश राऊत, वैभव पंडित, दिलीप कन्नाके, सागर वनस्कर, निकेत भलमे, अनिल राऊत, दिनेश करपते, देवराव नाखले (उपशहर प्रमुख, उबाठा), चेतन नगराळे, विजय धानोरकर, मोरश्वर फाटे, गिरीधर ससनकर, आकाश कुळसंगे, रामेश्वर एंबडवार, राहुल गुप्ता, महादेव गेडाम, शीकृष्ण जाधव, अंजना कुडमथे, अंकुश आत्राम, सदानंद कांबळे, चंदा बाई एचलवार, शेख सलमान, नयन कन्नाके, संदेश गिरी, रमेश गांधी, नरेश चांदेकर, राजेंद्र ठाकूर, काजल कुरेशी, मंगला चहार, सखूबाई छापेकर, अन्वर पटेल, गजानन सोनवणे, शीला वाकुलकर, भारती ठाकूर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0