छत्रपतींच्या पुतळ्यामागील धर्मध्वजा पुढे करा : मागणी

11 Mar 2026 21:03:30
हिंगणघाट,
shri-shiv-chhatrapati-udyan-hinganghat : छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्याच्या रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केले. धर्मरक्षक संभाजी महाराजांनी हौतात्म पत्करले. तोच भगवा मात्र हिंगणघाटच्या श्री शिव छत्रपती उद्यानात महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यामागे उभारण्यात आलेला आहे. हा भगवा ध्वज आमच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. हा भगवा आकाशाशी स्पर्धा करीत सर्वात समोर महाराजांच्या पुतळ्यासमोर असायला हवा. परंतु, चार वर्षाच्या प्रशासकीय काळात नपच्या अधिकार्‍यांनी चक्क हा ध्वजस्तन्भ महाराजांच्या पुतळ्यामागे चार फूट अंतरावर उभारलेला आहे. त्यामुळे अनेक शिवभतांच्या भावना दुखावल्या आहेत. हा ध्वजस्तंभ अश्वारूढ पुतळ्याच्या समोर उभारावा अशी मागणी करण्यात येत आहे.
 
 
 

jlk 
Powered By Sangraha 9.0