रोहित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट

11 Mar 2026 16:42:24
नवी दिल्ली,
Rohit Pawar met Nitin Gadkari दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत घडलेल्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघात घातपात होता की अनपेक्षित घटना, याविषयी संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनीही अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत अपघात आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा केली.
 
Rohit Pawar met Nitin Gadkari
 
डीजीसीएच्या अहवालावर त्यांनी आक्षेप घेतला आणि व्हिसीआर कंपनीच्या मालकांशी संबंधित प्रकरणांची माहिती मांडत थेट कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, काही प्रेझेंटेशनद्वारे स्पष्ट झाले की, संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत नाही आहे.रोहित पवार यांनी सांगितले की, संसदेतही अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित करावा, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. राज्यसभेत खा. सुप्रियाताईंच्या मदतीने इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा केला जात आहे. काँग्रेससह इतर सर्व पक्षही पारदर्शक चौकशीसाठी पाठबळ देत आहेत. रोहित पवारांनी काल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती.
 
आज त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर उन्नत महामार्गास स्व. अजित पवार यांचे नाव देण्याची विनंती केली. गडकरी यांनी या प्रक्रियेसाठी आवश्यक बाबी पूर्ण करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रोहित पवार म्हणाले की, एखाद्या विकास प्रकल्पाला नाव देताना त्या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या व्यक्तीचे नाव देणे अधिक योग्य ठरेल.अजित पवारांच्या अपघातावर संसदेत चर्चा होण्यास अडथळे येत असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले. राज्याच्या विधिमंडळात जसे चर्चा होत नाही, तसाच प्रश्न संसदेत देखील निर्माण झाला आहे, परंतु दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.याचबरोबर रोहित पवार यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेऊन अपघाताच्या संदर्भातील माहिती आणि कागदपत्रांची देवाणघेवाण केली. त्यांनी यासंदर्भात मार्गदर्शनही केले, असे रोहित पवारांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0