सेन्सेक्स १,००० अंकांनी घसरला,२.५० लाख कोटींचे नुकसान

11 Mar 2026 13:23:09
मुंबई,
Sensex falls by 1,000 points मंगळवारी शेअर बाजारात सुधारणा दिसत होती, सेन्सेक्स आणि निफ्टी वाढतील अशी अपेक्षा होती. अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराण-इस्रायल संघर्ष लवकर संपेल असे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीस सुरुवात केली होती. परंतु बुधवारी बाजार पुन्हा कोसळला.परदेशी गुंतवणूकदार तसेच रुपया विक्रीत उतरल्याने मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १,००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५३ अंकांनी खाली आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे २.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
 
 
 

Sensex falls by 1,000 points 
बुधवारी सेन्सेक्स ९६५ अंकांनी घसरून ७७,२३० वर पोहोचला तर निफ्टी २३,९८५ वर आला. अ‍ॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स २-४ टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, सन फार्मा आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात घसरले.निफ्टी ऑटो निर्देशांक जवळजवळ २% घसरला, तर निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक १.८% पेक्षा जास्त घसरला. मात्र, निफ्टी फार्मा निर्देशांक १% पेक्षा जास्त वाढला.
Powered By Sangraha 9.0