जेष्ठ महिला साठी स्त्रीशक्ती नृत्य नाटिका स्पर्धा

11 Mar 2026 16:50:08
नागपूर,
Stree Shakti Dance Drama आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि तेली समाज सभा यांच्या वतीने जेष्ठ महिलांसाठी स्त्रीशक्ती विषयावर नृत्य नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत दहा मंडळांनी सहभाग नोंदवला. यात छत्रपती नगर जेष्ठ नागरिक मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना माननीय कांचन गडकरी यांच्या हस्ते ₹११,०००/- परितोषिक देऊन सन्मानित केले गेले.
 
Stree Shakti Dance Drama
 
स्पर्धेत भाग घेतलेल्या सदस्यांमध्ये शोभा राऊत, वनमाला डोकरीमारे, छाया दियेवार, विजया राऊत, सुशमा वाकडे, सुप्रिया काळे, कल्पना कावळे, आशा हिवरकर, शमा योगि यांचा समावेश होता. Stree Shakti Dance Drama जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डोकरीमारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य: सुरेश चव्हारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0