महानिर्मितीच्या काेराडी केंद्रात वाफेच्या नळीत अचानक गळती, जळून चार कामगार जखमी

11 Mar 2026 15:15:51
अनिल कांबळे
नागपूर,
leak in steam pipe गेल्या काही दिवसांत कंपनी आणि कारखान्यातील दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. राऊळगावातील एसबीएल कंपनीनंतर आज बुधवारी काेराडी औष्णिक वीज केंद्रातील टर्बाइन देखभाल विभागात गरम वाफेच्या नळीत अचानक गळती झाल्याने चार कामगार जखमी झाले. या घटनेमुळे वीज केंद्रातील कामगारांमध्ये माेठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

कोरडी पॉवर स्टेशन  
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काेराडी येथील 660 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील टर्बाइन देखभाल विभागात काम सुरू असताना गरम वाफ वाहून नेणाऱ्या नळीत अचानक गळती झाली. या गळतीमुळे माेठ्या प्रमाणात गरम वाफ बाहेर पडली. त्या वेळी जवळच काम करत असलेल्या चार कामगारांच्या हात व पायांवर गरम वाफ गेल्याने ते भाजल्या गेले. भाजून जखमी झालेल्या कामगारांमध्ये रविंद्र नांदुरकर (वय 50), विशाल कांबळे (वय 40), राहुल केळकर (वय 35) आणि शैलेश मेश्राम (वय 35) यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ काेराडी वसाहतीतील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
..........
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली भेट
वीज केंद्रात ही घटना घडताच महानिर्मितीच्या काेराडी प्रकल्पातील संबंधित विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.leak in steam pipe या घटनेनंतर संबंधित विभागातील कामकाज काही काळासाठी थांबविण्यात आले हाेते. दरम्यान, गरम वाेच्या नळीत गळती कशामुळे झाली, याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे औद्याेगिक परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले हाेते.
......
Powered By Sangraha 9.0