वर्धा,
wardha-news : शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केला तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास ६० रुपयांनी वाढ झाली. त्याचा फटका जिल्ह्यालाही बसत असून मंगळवारी केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू गेला आहे. संबंधित कायदा लागू होताच आज बुधवार ११ रोजी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये म्हणून पुरवठा विभागाच्या नेतृत्वात जिल्ह्यात ९ पथक गठीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना इंडियन ऑईल, एचपीसीएल, बीपीसीएल या तीन प्रमुख कंपनींचे जवळपास ३३ अधिकृत विक्रेते तर ३ लाख ९६ हजार ५१९ ग्राहक आहेत. जिल्ह्यात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. एस्मा कायदा लागू होताच जिल्हा प्रशासनाने गॅस सिलेंडरची साठेबाजी करणार्यांवर धडक कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर प्रत्येकी एक व जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय ९ पथकं तयार केली आहे.
सध्यास्थितीत जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल मुबलक असून नागरिकांनीही कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी केले आहे.