शहरी लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळणार

11 Mar 2026 19:39:13
देसाईगंज, 
krishna-gajbe : नागरी क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळविण्यासाठी शासनाच्या जाचक अटींमुळे अनेक अडचणिंचा सामना करावा लागत होता. मात्र सर्वसामान्य जनतेला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी शासन स्तरावर अनेक पत्रव्यवहार करुन सर्वसाधारण लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी आदेश पारित करुन दिला. या उपलब्धीमुळे सर्वत्र कृष्णा गजबे यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
 
 
 
jk
 
 
 
शासन परिपत्रकानुसार घरकुल मिळविण्यासाठी गावठान नमुना 8 जागेच्या मालकीची कागदपत्र अशा अनेक जाचक अटी असल्यामुळे सर्वसाधारण लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी बरिच पायपीट करावी लागत होती. अनेक गरजू लाभार्थी या जाचक अटिंमुळे लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याने देसाईगंज नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांना सदर प्रकरणाची माहिती देत समस्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. जनतेच्या अपेक्षांना मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असलेले माजी आममदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे अप्पर सचिव रविंद्र खेतले यांची भेट घेत यावर चर्चा केली.
 
 
ज्यांच्याकडे घरटॅक्स पावती उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत अप्पर सचिवांनी ज्या लाभार्थ्याकडे तीन वर्षा पुर्वीची घरटॅक्स पावती उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना गावठान नमुना 8 जागेच्या मालकीच्या कागदपत्राची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 नुसार गावठान क्षेत्र व गावठान बाहेरिल क्षेत्र शासन परिपत्रक 2026/प्र. क्र. 49/ गृनिधो 2 नुसार जाचक अटी रद्द करुन सर्वसाधारण लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. या उपलब्धीसाठी देसाईगंज शहरातील नागरिकांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0