गोविंदा सुनीताचा घटस्फोट होणार का?

11 Mar 2026 11:46:58
मुंबई,
Govinda wife Sunita Ahuja बॉलीवूडचा हिरो नंबर 1 म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा Govinda आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैयक्तिक नाते गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. विविध माध्यमांमध्ये त्यांच्या लग्नात खटके, वादविवाद आणि संभाव्य घटस्फोटाच्या अफवांबाबत चर्चा होत आहेत, मात्र गोविंदा आणि सुनीता यांनी अद्याप या विषयावर सार्वजनिक भाष्य केलेले नाही. याच दरम्यान, त्यांची मुलगी टीना आहुजा हिने आई-वडिलांच्या वैयक्तिक जीवनाबाबत आपले विचार मांडले आहेत.
 

Tina Ahuja, Govinda wife Sunita Ahuja, Govinda Sunita divorce rumors 
टीना आहुजाने सांगितले की, गेली काही वर्षे आमच्यासाठी चांगली गेली नाहीत. “गेली दोन वर्षे खूप चढउतार आले,” असे तिने कबूल केले. तीने हेही नमूद केले की, तिने जागतिक महिला दिनानिमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी तिचा व्लॉग हायजॅक केला आणि तिला एक सॉलिटेअर रिंग भेट दिली. टीना म्हणाली, “आम्ही महिला इतरांसाठी खूप काही करतो आणि स्वतःबद्दल विचार करत नाही. म्हणून मी माझ्या आवडत्या महिलेसाठी काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला.”सुनिता आहुजाने टीना दिलेल्या भेटीबद्दल कौतुक करत सांगितले, “टीना एका दागिन्यांच्या डिझाइन कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे आणि ही तिने मला दिलेली भेट आहे. Govinda wife Sunita Ahuja तिने पैसे कमवले, म्हणून तिने मला ही भेट दिली. माझ्या कलेक्शनमधील ही आणखी एक सॉलिटेअर अंगठी आहे.”गोविंदावर पूर्वी कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप सुनीता आहुजाने केले होते. मात्र, गोविंदाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील चढउतार आणि तणावामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लहर पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर, टीना आहुजाच्या खुलास्यामुळे कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेला एक नवीन वळण मिळाले आहे. तिच्या सरळ शब्दांमुळे चाहत्यांना गोविंदाच्या कुटुंबातील वास्तव परिस्थिती समजण्याची संधी मिळाली आहे.
Powered By Sangraha 9.0