मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

12 Mar 2026 15:12:18
पय्यन्नूर,
Actor Harimurli dies मल्याळम चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेता हरिमुरलीचा अवघ्या २७ वर्षांच्या वयात मृत्यू झाला आहे. केरळमधील पय्यन्नूर येथील राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिमुरलीचा मृतदेह सध्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असून नेमक्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 

murli 
 
हरिमुरलीने लहानपणीच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. बालकलाकार म्हणून त्याने जवळपास ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 'रसीकन', 'अन्नन थम्पी', 'मादम्बी', 'डॉन', 'पट्टनथील भूत' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांत त्याने बालभूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले. चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी हरिमुरलीच्या अकाली निधनावर हळहळ व्यक्त केली असून, त्यांच्या योगदानाला सलाम दिला जात आहे.
Powered By Sangraha 9.0