लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

12 Mar 2026 19:43:20
कोरची, 
तालुक्यातील जांभळी येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरची पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जांभळी येथील Ajay Kallo अजय टिल्लू कल्लो (25) याने गावाशेजारी राहणार्‍या 17 वर्षे 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला 14 फेब्रुवारी 2025 रोजी भेटून तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगत विश्‍वासात घेतले. त्यानंतर पीडिता अल्पवयीन असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
 
 
ajay
 
यानंतर लग्नाचे आश्‍वासन देत आरोपीने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन कोरची येथे आरोपीविरुद्ध कलम 64(2)(एम), 64(2)(आय) तसेच पोक्सो कायदा कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी Ajay Kallo  अजय टिल्लू कल्लो याला 11 मार्च 2026 रोजी रात्री 8.06 वाजता अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0