बारामती
Ajit Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नेते आणि कार्यकर्ते या अपघातास घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर आहेत, तर काहींनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चार पत्रकार परिषदेत अपघाताच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप मांडले. त्यांनी VSR कंपनी आणि मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात आरोप करत वैमानिकाच्या माध्यमातून अपघात घडवला गेला असल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि सीआयडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.धाराशिवमध्ये सुरू असलेल्या उपोषणात मोहन मुंडे यांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यांनी अपघाताच्या आधीच्या CCTV फुटेज सार्वजनिक करण्यास सांगितले, दोषींवर FIR दाखल करण्याची मागणी केली, तसेच अपघाताची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास १ मे रोजी मुंबईमध्ये मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अजित पवार Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील काही नेते आणि पदाधिकारी तपासाच्या गतीवर अस्वस्थ आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी निर्माण झाली असून, काही नेते मौन पाळत आहेत. या परिस्थितीत उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा ही पद्धत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी वापरली आहे.या प्रकरणामुळे पक्षात तणाव वाढला असून, अपघाताशी संबंधित चौकशी आणि तपास यावर देशभरातून लक्ष केंद्रीत झाले आहे. पक्षाचे नेतृत्व आणि सरकार या परिस्थितीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच अपघाताची कारणे स्पष्ट करण्यासाठी तातडीच्या निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात येत आहे.