१२ लाखांहून अधिक कार्ड वितरित
समाधान शिबिरांत कॅम्प सुरू करा
यवतमाळ,
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत Ayushman cards आयुष्मान कार्डचे वितरण मिशनमोडवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेची आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील Ayushman cards आयुष्मान भारत गोल्डन कार्ड व वंदना कार्ड वितरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवून सर्वांचे ईकेवायसी करून कार्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर करावे. यासाठी नोडल अधिकारी नेमावे. तसेच या उपक‘मात चांगली कामगिरी करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना पुरस्कार द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले.
तसेच सध्या जिल्ह्यातील सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरां’मध्ये आयुष्मान कार्ड अर्ज, नोंदणी, ईकेवायसी व वितरणासाठी विशेष कॅम्प घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून काम करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीच्या अंतिम टप्प्यात आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेसंदर्भात तक‘ारींचा आढावा घेतला. यावेळी अधिकार्यांनी योजना अंमलबजावणीतील प्रगती, अडचणी आणि पुढील नियोजनाबाबत माहिती सादर केली.