वर्धा,
bad weather होळीनंतर जिल्ह्यात उन्हाचा कहर पहायला मिळाला. सध्या जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या नागपूर येथील वेध शाळेने वर्धा जिल्ह्यात १४ ते १६ मार्च दरम्यान वादळी वार्यांसह अवकाळी पावसाची शयता वर्तविला असून सतर्कतेचा इशाराही जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
bad weather जिल्ह्यात १४, १५ व १६ मार्च रोजी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शयता वर्तविण्यात आली आहे. या काळात ४० ते ५० किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील. जिल्ह्यातील शेतकरी सध्या गहु, चणा पिकाची कापणी व मळणीच्या कामात गुंतले आहेत तर काही शेतकर्यांनी यंदा रबी हंगामात भाजीपाला पिकाचीही लागवड केली आहे. अशास्थितीत शेतकर्यांनी सावधगिरी न बाळगल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. संबंधित परिस्थिती बघता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रामुख्याने कृषी विभागाला शेतकर्यांना नैसर्गिक संकटाची पूर्व सूचना देत वेळीच खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याची सूचना दिल्या आहेत.