विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण

12 Mar 2026 19:46:14
शिक्षण विभागाने गठित केली तीन सदस्य समिती!
विद्यार्थी आणि पालकांचे नोंदविले बयान

भंडारा :
'Bal Vikri Prakaran बाळ विक्री प्रकरण जिल्ह्यात गाजल्यानंतर, जिल्हा परिषद शाळेतील चौथ्या वर्गातील पाच मुलींसोबत शिक्षकाने केलेल्या अश्लील कृत्याने समाजमन सुन्न झाले आहे. शिक्षकाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच, पोलिसांसोबत शिक्षण विभागानेही आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान शिक्षण विभागाने तीन सदस्यीय समिती तयार करून आज शाळेतील विद्यार्थी आणि पालकांचे बयान नोंदविले आहे.
 
 
crime
 
पवनी पंचायत समिती अंतर्गत वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिलकुमार राऊत याचे अत्यंत घृणास्पद प्रताप उघडकीस आले. या वर्गातील पाच मुलींसोबत अत्यंत केळसवाणे प्रकार करणारे या शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच झोप दिला. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रतापी शिक्षकाचे अनेक प्रताप आता उघडकीस आले असून यापूर्वीही लाखांदूर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यानी हेच प्रकार केले होते. लाखांदूर येथील एका प्रकरणात अनिल राऊत दोषी असल्याचा अहवाल त्यावेळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. तीन महिने या 'Bal Vikri Prakaran  प्रकरणात सदर शिक्षक तुरुंगात राहिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल असताना आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असतानाही शिक्षक निर्दोष सुटला हे सर्वांसाठीच आश्चर्याची आहे. कदाचित याच निकालाचा आधार घेत शिक्षकाचा तुरुंगातील तीन महिन्याचा कालावधी सेवाकाळ म्हणून गृहीत धरला गेला असावा. मात्र हा प्रकार नक्कीच तपासातील त्रुट्यांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा आहे.
 
 
दरम्यान वडेगाव येथील प्रकरणानंतर आता शिक्षण विभागाने याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. मंगला गोतारने, उपशिक्षणाधिकारी मोहन उशिरे, पवनी चे गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक या समितीत समावेश असून या समितीने आज शाळेला भेट देत तेथील विद्यार्थी आणि पालकांचे बयान नोंदविल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी दिली आहे. समितीच्या अहवालानंतर सदर शिक्षकावर बडतर्फीची कारवाई होते की आणखी काही? हे पहाणे योग्य ठरेल.
Powered By Sangraha 9.0