‘चेक बाउन्स’वाल्या कर्जदाराला ८० लाखांचा दंड व ३ महिन्याचा कारावास

12 Mar 2026 18:13:31
राजलक्ष्मी पतसंस्थेचा कायदेशीर विजय

यवतमाळ, 
'check bounce' case चेक बाऊन्स प्रकरणात यवतमाळ येथील न्यायालयाने राजलक्ष्मी मल्टिस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बाजूने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी अमर प्रकाश शिंदे यांना दोषी ठरविले आहे. न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांची साधी कैद तसेच रुपये ८० लाख दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पतसंस्थेची बदनामी करणार्‍या तसेच कर्ज बुडवू पाहणार्‍या थकित कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.
 
 
rajlakshmi
 
'check bounce' case  राजलक्ष्मी पतसंस्थेकडून सिंदिया बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सचे संचालक प्रकाश शिंदे यांनी सुमारे ४० लाख रुपये कर्ज घेतले आहे. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांची कायदेशीर जबाबदारी होती. परंतु वारंवार मागणी केल्यानंतरसुद्धा त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. अशा परिस्थितीत अमर शिंदे यांनी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता थकित रकमेपैकी काही भाग भरण्यासाठी रुपये ५० लाख रुपयांचा पतसंस्थेला दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत सादर केल्यानंतर अपुरा निधी या कारणावरून अनादरित झाला.
 
 
'check bounce' case  त्यानंतर अमर शिंदे यांना पतसंस्थेने कायदेशीर नोटीस दिली. मात्र नोटीस मिळूनही आरोपीने देय रक्कम अदा केली नाही. त्यामुळे राजलक्ष्मी मल्टिस्टेटने अ‍ॅड| लक्ष्मीकांत सानप यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार  दाखल केली. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असे नमूद की, आरोपीने दिलेला धनादेश हा कायदेशीर देयतेच्या परतफेडीसाठी देण्यात आला होता. धनादेश अनादरित झाल्यानंतर नोटीस मिळूनही आरोपीने रक्कम अदा न केल्यामुळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीस ३ महिन्यांची साधी कैद व रुपये ८० लाख दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच होणारी दंडाची रक्कम तक्रारदार पतसंस्थेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0