देवळीत व्यावसायिक दुकानांवर धाड, बारा सिलेंडर जप्त

12 Mar 2026 20:09:10
पुरवठा विभागाची कारवाई
 
देवळी, 
Commercial cylinder seized in Deoli  शासनाच्या आदेशानुसार तालुकास्तरावर गठीत करण्यात आलेल्या पथकाने पहिल्याच दिवशी देवळी शहर व परिसरातील व्यावसायिक ठिकाणांवर धाड टाकून घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड केले. या कारवाईत देवळी शहरातून ७, भिडी येथून २ तर हुस्नापूर टोल परिसरात ३ असे १२ घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले.
 
 
cylinder
 
Commercial cylinder seized in Deoli गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची कोंडी होत असताना प्रशासनाने गॅसचा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्ह्यात ९ पथकं तयार केली आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होताना दिसताच कारवाई करण्याचे आदेश असतानाच आज पहिल्याच दिवशी देवळी तालुयात दुपारपर्यंत देवळी शहर, भिडी आणि हुस्नापूर टोल परिसरातून ३ घरगुती सिलेंडर जप्त केले.
 
 
Commercial cylinder seized in Deoli  ही कारवाई देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी चांदनी शिवरकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयातील लिपिक अजिंय गोठाणे व इतर कर्मचार्‍यांच्या पथकाने देवळी शहरातील हॉटेल, चहा कॅन्टीन, चायनीज सेंटर व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली. तपासणीदरम्यान घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याचे आढळून आल्याने ते जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली. या धाडीमुळे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने घरगुती सिलेंडरचा वापर करणार्‍या काही दुकानदारांची धावपळ झाली. सध्या गॅस पुरवठा मर्यादित असल्याने सरकारने घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असून कॅटरिंग, हॉटेल, चहा कॅन्टीन व चायनीज व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होत आहे.
Powered By Sangraha 9.0