विक्री न करण्याच्या एजन्सींना प्रशासनाच्या सूचना
दवाखाने, कारागृह, वसतिगृह, निवासी शाळांना घरगुती सिलिंडरचा होणार पुरवठा
वर्धा,
युद्धाचे परिणाम सध्या जिल्ह्यातही पहायला मिळत आहे. Commercial gas cylinder व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सरकारने बंद केला असून एस्मा कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यावर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा किती साठा जिल्ह्यात आहे याची माहिती प्रशासनाने घेतल्यानंतर धकादायक बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात १९ किलोचे २७५ तर ५ किलोचे १७३ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा असून ते विक्री न करण्याच्या सूचना प्रशासनाने गॅस एजन्सीना दिल्या असून हे सिलेंडर प्रशासनाने होल्डवर ठेवले आहेत.
एस्मा कायदा लागू झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या आयुत दीपा मुंडे यांनी ११ मार्च रोजी आदेश निर्गमित करून वसतिगृह व निवासी शाळांना घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर नियमानुसार दवाखाने, वसतिगृह, कारागृह, निवासी शाळांना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे. तशा सुचनाही अधिकार्यांनी संबंधितांना दिल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यात Commercial gas cylinder व्यावसायिक गॅस सिलिंडरचा नाममात्र साठा आहे. ते गॅस सिलेंडर वितरित न करण्याच्या सूचना एजन्सीना देण्यात आल्या आहे. अशातच आगामी काळात व्यवसायासाठी विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होण्याची शयता असताना कुठलीही ठोस उपाययोजना उद्भवणार्या समस्येला तोंड देण्यासाठी सध्या प्रशासनाकडे नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा भडका उडण्याची शयता व्यत केली जात आहे.
रिफील बुक करताना अडचणी
शाळा, दवाखाने, वसतिगृह, कारागृह, निवासी शाळांना घरगुती गॅस सिलेंडर वितरित करण्यात येणार असले तरी ऑनलाईन बुकींग क्रमप्राप्त आहे. सध्या रिफिल बुक करताना नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.