गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

12 Mar 2026 20:54:34
राष्ट्रपतींना पाठविले निवेदन
वर्धा, 
gas cylinders गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली. याचा मोठा फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच जनसामान्य विरोधी धोरणाचा निषेध चूल पेटवून आणि ‘पीएम हटाओ देश बचाव’चा नारा देत काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले.
 
 
chle
 
gas cylinders व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांच्या घरात तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १९०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे. पूर्वी गॅस सिलेंडर मिळण्याचा लॉकिंग कालावधी १५ दिवसांचा होता. पण आता तो २५ दिवसांचा करण्यात आला आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा केंद्र सरकारने बंद केल्याने व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. आंदोलनाचे नेतृत्व अरुणा धोटे, धर्मपाल ताकसांडे, अरुणा धोटे, प्रभाकर धोटे, ऋतुजा भोयर, मनिषा मेघे यांनी केले. आंदोलनात डॉ. अभ्युदय मेघे, नंदकुमार वानखेडे, धनंजय देशमुख, मोनाली वंजारी, किरण दाते, सोनू गुरनुले, दीपा डोके, राजेंद्र शर्मा, दुर्गा सहारे, रमा सहारे, उषा नांदुरकर, संजय शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0