वणी,
वणी तालुक्यातून वाहणार्या वर्धा नदीवरील भुरकी रेती घाटाचे गुरुवार, १२ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या घाटातून Gharkul: Distribution of sand घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी नागरिकांना नियमानुसार रेतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी भुरकीच्या सरपंच सीमा बदकी, तलाठी शेख, घाटधारक महादेव पानघाटे, प्रवीण झाडे, अतुल हिवरकर, सूर्यकांत मोरे, धर्मा काकडे, सुमित ठेंगणे, मनोज मिलमिले, अतुल बोबडे, प्रमोद मिलमिले, गुलशन खुराणा, भोला चिकनकर, धीरज पेचे तसेच व परिसरातील नागरिक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
Gharkul: Distribution of sand कार्यक‘मात घरकुल योजनेचे लाभार्थी असलेल्या भुरकी येथील आनंद लांबट, साईनाथ लांबट व इतर घरकुलधारकांना रेतीचे वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक‘मामुळे घरकुलधारकांना घरबांधणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या नियोजनबद्ध उपक‘मामुळे घरकुलधारकांना वेळेत नियमांनुसार रेती उपलब्ध होत असून, घरबांधणीच्या कामांना गती मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.