गडचिरोली,
Gondwana University exam गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील मूल्यांकन प्रक्रियेबाबत चुकीची माहिती पसरविण्यात आली असून त्यामुळे गैरसमज निर्माण होत असल्याचे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने आज पत्र परिषद बोलावून चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Gondwana University exam परीक्षा व मूल्यांकनाचे काम सुरळीत सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असून परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळलेली नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. काही चर्चांमुळे शंका निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन चौकशी केली. मात्र त्यामध्ये कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परीक्षा सुरक्षित व नियमानुसार पार पडत असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या पत्रपरिषदेला कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, परीक्षा नियंत्रक पोटदुखे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे आदींची उपस्थिती होती.