हिंदू समाजाच्यावतीने केटीनगरात हिंदू महासंमेलन

12 Mar 2026 19:17:33
नागपूर,
केटीनगर येथील नक्षत्र गार्डन येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने Hindu Sammelan हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू महासंमेलनाच्या शुभप्रसंगी जागृतेश्वर शिव मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच गौपूजन, भारत माता पूजन, अथर्वशीर्ष, विष्णु सहस्रनाम, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.
 
 
k-t-nagar-hindu-samelan
 
Hindu Sammelan हिंदु धर्म जागरण व पंचपरिवर्तन या मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ब्रह्माकुमारी सीमा दीदी, तसेच भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास चाचरा, पूनम हिंदुस्थानी, दीप्ती चाचरा, साधना बरडे, रंजना गुप्ता, ब्रह्माकुमारी संगम दीदी आदींची विशेष उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0