देवळीत महिला मोर्चातर्फे स्त्री शतीचा सन्मान

12 Mar 2026 20:23:54
देवळी,
 भाजपा महिला मोर्चाच्या वतीने International Women's Day जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा, नवनिर्वाचीत महिला नगराध्यक्ष, सभापती, नगर सेवक सत्कार व महिला भजन मंडळांचा सत्कार करण्यात आला. स्वयंसिद्धा उद्योजक विकास अभियान अमरावतीच्या संयोजक डॉ. मोनिका उमक अध्यक्षस्थानी होत्या. मेळाव्याचे उद्घाटन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष शोभा तडस उपस्थितीत होत्या.
 
 
International Women
 
यावेळी डॉ. मोनिका उमक म्हणाल्या की, एक काळ असा होता की मुलींना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, पंडिता रमाबाई यांनी मुक्ती धर्म ही संस्था स्थापन करून विधवांच्या शिक्षणासाठी लढा दिला. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सोसायटी स्थापन करून महिला सन्मानासाठी सामाजिक सुधारणा घडवल्या. या महिलांनी सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा अन्यायकारक प्रथा मोडून समाजाला नवे दृष्टिकोन दिला. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातुन आपले कर्तृत्व दाखवत आहेत. त्या देशाचे, समाजाचे आणि कुटुंबाचे नेतृत्व समर्थपणे करत असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
International Women's Day  यावेळी हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, आर्वीच्या स्वाती गुल्हाने, सिंदी येथील राणी कलोडे, सभापती शुभांगी कुर्जेकर, मनिषा लोखंडे, उपसभापती ज्योती खाडे, सुरेखा कारोटकर, मंगला पिंपळकर, विभावरी बजाईत, विश्वजिता पोटदुखे, ललिता धुर्वे, शितल तर्‍हेकर, पुष्पा डायगव्हाने, किर्तीताई सायंकार, सारीका ठाकुर, महिला पोलिस प्रियंका तायवाडे, विद्या झिलपे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोडतीच्या माध्यमातून १० महिलांना पैठणी देण्यात आल्या तर देवळीतील ५० महिला भजन मंडळांचा सन्मान चिन्हे देवुन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक शोभा तडस यांनी केले. संचालन नंदा वैद्य यांनी केले तर आभार विद्या झिलपे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0