क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूर सोबत अडकली लग्नबंधनात कृतिका कामरा

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Kritika Kamra wedding अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट आणि क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूर यांनी बुधवारी, ११ मार्च रोजी मुंबईत खासगी समारंभात लग्नगाठ बांधली. हा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीने आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. लग्नानंतर नवदाम्पत्याने बाहेर येऊन माध्यमांना आणि पापाराझींना अभिवादन केले.
 

Kritika Kamra wedding  
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कृतिका आणि गौरव दोघेही हसतमुखाने कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. कृतिकाने लाल रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती, ज्यामध्ये ती अत्यंत देखणी दिसत होती, तर गौरवने क्रीम रंगाची शेरवानी घालून आपला लूक अधिक आकर्षक केला होता. दोघेही हातात हात घालून उभे राहून फोटोग्राफर्ससाठी पोझ देताना दिसले.मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला आणि फक्त एक छोटी पूजा करण्यात आली होती. अद्याप नवदाम्पत्याने अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.
लग्नसमारंभाला बॉलिवूड Kritika Kamra wedding  आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री सोहा अली खान, अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर, अभिनेत्री अन्या सिंग तसेच मलायका अरोरा यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. याशिवाय अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचे पती अंगद बेदी यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
 
 
फक्त चित्रपटसृष्टीतील Kritika Kamra wedding  कलाकारच नव्हे, तर क्रिकेट क्षेत्रातील काही माजी खेळाडूही उपस्थित होते. भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, अजित अगरकर, आशिष नेहरा आणि झहीर खान यांनी त्यांच्या पत्नींसह नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.गौरव कपूर हे भारतातील प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट, क्रिकेट प्रेझेंटर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखले जातात. त्यांनी रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर व्हिडिओ जॉकी (VJ) म्हणून Channel V वर लोकप्रियता मिळवली. अभिनय क्षेत्रातही त्यांनी हात आजमावला, परंतु पुढे क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याकडे लक्ष दिले. त्यांनी Extraaa Innings T20 आणि Cricbuzz Live सारख्या लोकप्रिय क्रिकेट शोचे सूत्रसंचालन केले. याशिवाय त्यांनी स्वतःचा यूट्यूब शो Breakfast with Champions सुरू केला, ज्यात त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंशी संवाद साधला.गौरव कपूर यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी यापूर्वी अभिनेत्री किरत भट्टल यांच्याशी २०१४ मध्ये विवाह केला होता, परंतु २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांच्या लग्नामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावर नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.