मुंबई
Sanjay Raut देशातील एलपीजी गॅस पुरवठा संकटग्रस्त झाला आहे. इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस, पेट्रोल-डिझेल आणि इंधनाचे संकट निर्माण झाले असून, हॉटेल व्यवसायिकांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गॅसच्या कमतरतेमुळे ताण निर्माण झाला आहे. अनेक एजन्सींच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
या परिस्थितीवर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला असून, पंतप्रधान आणि भाजपवर देशातील गंभीर समस्या दुर्लक्ष करत निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला. राऊत म्हणाले की, देशात गॅस टंचाई आहे, पण पंतप्रधान केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये निवडणूक प्रचारात मशगूल आहेत, हे देशाच्या हिताशी विसंगत आहे.
संजय राऊतांनी Sanjay Raut आपल्या वक्तव्यात कटाक्षाने सांगितले, “फक्त ‘जय श्रीराम’ म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात येईल. ‘नमो नमो’ हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेल देखील घरपोच मिळेल.” त्यांनी देशात अंधभक्ती वाढल्याचा उल्लेख करत, गॅस, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या टंचाईकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला.राऊतांनी पंतप्रधानांवरही थेट टीका करत म्हटले की, इराण-इस्त्रायल युद्धाबाबत अनेक देशांनी प्रतिक्रिया दिल्या, पण भारताने अद्याप ठोस भूमिका घेतली नाही. “देशातील जनतेसाठी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, पण पंतप्रधान फक्त निवडणुकीसाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करत आहेत. देशाचे परराष्ट्र धोरण, जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यावर त्यांचा अजिबात विचार दिसत नाही,” असे राऊत म्हणाले.संजय राऊतांच्या या वक्तव्याने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राजकीय वातावरण तापले असून, देशातील ऊर्जा पुरवठा आणि परराष्ट्र धोरणाबाबत प्रश्नांचीच झळ निर्माण झाली आहे.