“ती माझी चूक होती”; अक्षरला वगळल्याबद्दल सूर्यकुमारने मागितली माफी

12 Mar 2026 11:43:26
नवी दिल्ली,  
suryakumar-apologizes-to-akshar वीस षटकांच्या विश्वचषक २०२६ दरम्यान घेतलेल्या एका निर्णयाबद्दल भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्पष्ट कबुली दिली आहे. महत्त्वाच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला अंतिम अकरातून वगळणे ही स्वतःची चूक असल्याचे त्याने मान्य केले. या निर्णयामुळे पटेल नाराज झाल्याचेही त्याने सांगितले असून सामन्यानंतर त्याची वैयक्तिकरित्या माफी मागितल्याचे सूर्यकुमारने स्पष्ट केले.
 
suryakumar-apologizes-to-akshar
 
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्याआधी किरकोळ दुखापतीमुळे अक्षर पटेल नेदरलँड्सविरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला वगळण्यामागे केवळ संघाची रणनिती कारणीभूत होती आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली. यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले की त्या सामन्यानंतर पटेलशी झालेली चर्चा सोपी नव्हती. अक्षर नाराज असणे स्वाभाविक होते, कारण तो अनुभवी खेळाडू आहे आणि यापूर्वी एका संघाचे नेतृत्वही त्याने केले आहे. suryakumar-apologizes-to-akshar परिस्थिती लक्षात घेऊन मी त्याची माफी मागितली आणि हा निर्णय स्वतःची चूक असल्याचेही मान्य केले, असे सूर्यकुमारने सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा चर्चा झाल्यानंतर दोघांमधील गैरसमज दूर झाले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अक्षर पटेलला बाहेर ठेवण्याचा निर्णय स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने लगेचच बदल करत पुढील सामन्यात अक्षरला पुन्हा अंतिम अकरात स्थान दिले. संपूर्ण स्पर्धेत अक्षर पटेलने प्रभावी कामगिरी केली. suryakumar-apologizes-to-akshar आठ सामन्यांत त्याने अकरा बळी घेत मधल्या षटकांत संघाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध त्याने २७ धावांत तीन बळी घेत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याआधी इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने घेतलेले दोन झेलही निर्णायक ठरले. गोलंदाजीबरोबरच गरजेच्या वेळी फलंदाजीतही त्याने जलद धावा करून संघाला आधार दिला. अखेरीस अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत वीस षटकांचा विश्वचषक सलग दुसऱ्यांदा जिंकला आणि या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपद टिकवून ठेवणारा पहिला संघ बनला.
Powered By Sangraha 9.0