एअर अरेबियाद्वारे अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत
नागपूर,
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे तात्पुरती बंद पडलेली Nagpur-Sharjah flight नागपूर-शारजाह विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नियोजन केल्या आहे. एअर अरेबिया १३ आणि १५ मार्च रोजी नागपूर ते शारजाह विमानसेवा सुरू करण्याची तयारी असल्याची माहिती एअर अरेबियाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम आशियाई हवाई क्षेत्रात वाढत्या धोक्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर परिणाम झाला आहे. परिणामी, एअर अरेबियाने नागपूर-शारजाह विमानसेवा तात्पुरती स्थगित केली. एअर अरेबियाने १३ आणि १५ मार्च संभाव्य उड्डाणांचे प्राथमिक वेळापत्रक निश्चित केले आहे. कंपनीकडून अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. ही सेवा सुरू झाल्यास मध्य पूर्वेत अडकलेल्या नागपूरातील हजारो प्रवाशांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे.
मध्य पूर्वेतील तणाव आणि हवाईहद्द बंद झाल्यामुळे दहा दिवसांपूर्वी विमानसेवा विस्कळीत झाली होती. एअर अरेबिया Nagpur-Sharjah flight नागपूर ते शारजाहदरम्यान आपली विमानसेवा पुन्हा करण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीद्वारे अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. नागपूर विमानतळावरून शारजाह आणि दोहा या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सेवा चालवल्या जातात. विमान सेवा स्थगित असल्याने प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीमार्गे प्रवास करावा लागत आहे. थेट विमान सेवा सुरू झाल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.