शिंपी समाज बांधवांचे नगराध्यक्षांना निवेदन
यवतमाळ,
Namdev Maharaj Temple शहरातील जांब मार्गावर दांडेकर लेआऊटमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पूर्वीपासून मंदिर आहे. या मंदिराजवळ रस्त्यालगत काही व्यवसायींनी अतिक्रमण केले आहे. आता या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यामुळे मंदिराशेजारी असलेली ही अतिक्रमणे काढून टाकण्यात यावी, अशी मागणी शिंपी समाज बांधवांनी नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात गुरुवार, १२ मार्च रोजी निवेदन सादर करण्यात आले. नामदेव महाराज यांचे हे मंदिर शहरातील हजारो शिंपी समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराजवळ संत नामदेव महाराज समाज भवन उभारण्यात आले असून संत शिरोमणी नामदेव महाराज समाज उन्नती मंडळाच्या वतीने या समाज भवनामध्ये विविध कार्यक‘म राबवण्यात येतात.
या Namdev Maharaj Temple संत नामेदव महाराज मंदिराजवळ जांब रस्त्यालगत काही व्यवसायींनी टिनशेड टाकून व्यवसाय आहेत. मात्र आता या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यामुळे समाज बांधवांनी या व्यवसायींना त्यांची अतिक‘मणे काढण्याची विनंती केली. त्यासंदर्भात एक नोटीस देखील त्या ठिकाणी लावण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ही अतिक‘मणे काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शिंपी समाज बांधवांनी गुरुवारी नगर परिषद कार्यालय गाठून नगराध्यक्षांना निवेदन दिले. त्यामध्ये मंदिरालगत असलेली तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच कारवाई करु असे आश्वासन नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी यावेळी दिले. हे निवेदन नप उपमु‘याधिकारी भोयर यांनी स्वीकारले. यावेळी शिंपी समाज अध्यक्ष जितेंद्र फुसे, सचिव विनेश वंदेकर, उपाध्यक्ष गजानन तिजारे, संगीता दांडेकर, अजय दीडमुठे, अजय गोहणे, योगेश मनोहर कापसे, रवींद्र तिजारे, सुनील कापसे, सुनील डवले, शैलेश वंदेकर यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
जांब मार्गाचे संत नामदेव महाराज मार्ग नामकरण
शहरातील जांब मार्गावर सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले मंदिर केवळ शिंपी समाज बांधवच नव्हे तर या परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. याच कारणावरून जांब मार्गाचे संत शिरोमणी नामदेव महाराज मार्ग असे करण्यात आले आहे. तत्कालीन वडगावरोड ग‘ामपंचायतने तसा ठरावही केला असून या मार्गाच्या नामकरण फलकाचे अनावरण तत्कालीन आमदार मदन येरावार यांनी केले आहे. मात्र आता त्या फलकाजवळही अतिक‘मण करण्यात आले आहे.