प्रियांका चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर...निक जोनासच्या बहिणीचे निधन

12 Mar 2026 11:22:07
अमेरिका,
Maya Kibel death हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक निक जोनास याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती असलेल्या निक जोनासच्या बालपणीच्या मैत्रीण माया किबेलचे निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे निकसह त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकांनी मायाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.निक जोनास माया किबेलला बहीण मानत होते.
 

Nick Jonas, Priyanka Chopra husband Nick Jonas, Maya Kibel death 
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय माया किबेल गेल्या काही काळापासून विल्सन रोग या दुर्मिळ अनुवांशिक आजाराशी झुंज देत होती. दीर्घकाळ उपचार सुरू असतानाही तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अखेर ७ मार्च रोजी सकाळी ती अचानक कोसळली. त्यानंतर तिचे हृदय आणि फुफ्फुसे काम करणे थांबले आणि तिला तातडीने रुग्णालयातील आपत्कालीन विभागात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला.
मायाच्या निधनाची Maya Kibel death माहिती तिची आई कियोको किबेल यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावुक पोस्टद्वारे दिली. आपल्या मुलीच्या आठवणी सांगताना त्यांनी लिहिले की, “ही दुःखद बातमी मी खूप वेदनांनी शेअर करत आहे. मायाने विल्सन आजाराशी खूप धैर्याने लढा दिला. तिने प्रचंड संघर्ष केला, पण तिचे शरीर आता साथ देत नव्हते. अनेकदा ती वेदनांमुळे रडत झोपायची. मात्र आता ती स्वर्गात आहे, जिथे तिचे वडील आहेत आणि तिला कोणतीही वेदना किंवा अश्रू नाहीत.”पुढे त्यांनी लिहिले, “ज्यांना तिच्या निधनावर विश्वास बसत नाही, त्यांनी हे जाणून घ्यावे की ती आता सर्वोत्तम ठिकाणी आहे. मला खात्री आहे की ती वरून आपल्या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. ती जिवंत असताना ज्यांनी तिच्यावर प्रेम केले, तिची काळजी घेतली त्या सर्वांचे मनापासून आभार. एक आई म्हणून मला तिची खूप आठवण येते आणि मी पूर्णपणे खचून गेले आहे. मात्र ती आता वेदनांपासून मुक्त आहे, यामुळे मला थोडे सांत्वन मिळते.”माया किबेल आणि निक जोनास यांचे नाते बालपणापासूनच खूप जवळचे होते. माया ही जोनास कुटुंबासोबतच वाढली होती आणि निक तसेच त्याच्या भावांसोबत तिचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निक तिला अनेकदा “माझी बहीण” असे संबोधत असे आणि तिला आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानत असे. मनोरंजन क्षेत्रातील सुरुवातीच्या काळातही ती अनेकदा जोनास कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असे.मायाच्या निधनानंतर निक जोनासनेही सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले. त्याने मायाला “माझी कायमची बहीण” असे संबोधत तिच्या कुटुंबाला या कठीण काळात साथ देण्याचे आश्वासन दिले. निकचा हा भावनिक संदेश पाहून चाहत्यांनीही मायाला श्रद्धांजली अर्पण करत जोनास कुटुंबाला धीर दिला आहे.
Powered By Sangraha 9.0