गैर-हिंदूंना केदारनाथ-बद्रीनाथमध्ये प्रवेशबंदी

12 Mar 2026 11:38:46
आता
Non-Hindus banned from Kedarnath उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थस्थळे असलेल्या बद्रीनाथ मंदिर आणि केदारनाथ यांसह मंदिर समितीच्या अखत्यारीतील अनेक मंदिरांमध्ये प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरांचे पावित्र्य आणि धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने गैर-हिंदूंना मंदिर परिसरात प्रवेश न देण्याचा प्रस्ताव समितीने मंजूर केला आहे. हा निर्णय देहरादून येथे झालेल्या मंदिर समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की चारधाम तसेच समितीच्या अधिकारातील एकूण ४७ मंदिरांमध्ये हा नियम लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यांच्या मते, सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या भाविकांनीच या पवित्र स्थळांना भेट द्यावी, अशी भावना लक्षात घेऊन हा निर्णय पुढे नेण्यात आला आहे. ही मर्यादा मंदिराच्या गर्भगृहासह संपूर्ण परिसरात लागू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 

Non-Hindus banned from Kedarnath 
याच बैठकीत आगामी तीर्थयात्रेच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील आर्थिक वर्षासाठीचा अंदाजित अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला. २०२६-२७ या वर्षासाठी सुमारे १२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी बद्रीनाथ धामासाठी ५७.५ कोटी रुपये आणि केदारनाथ धामासाठी ६३.६ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.याशिवाय तीर्थ पुरोहितांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी विशेष कल्याण निधी स्थापन करण्यालाही समितीने मान्यता दिली आहे. या निधीतून मंदिराशी संबंधित पुजाऱ्यांना आर्थिक मदत आणि इतर कल्याणकारी सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
 
 
दरम्यान, यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेची सुरुवात अक्षय तृतीया या शुभदिनी म्हणजे १९ एप्रिलपासून होणार आहे. गंगोत्री मंदिर आणि यमुनोत्री मंदिराचेदरवाजेही त्याच दिवशी भाविकांसाठी उघडले जातील. त्यानंतर केदारनाथ मंदिराचेदरवाजे २२ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता उघडणार आहेत, तर बद्रीनाथ मंदिराचे येथे २३ एप्रिल रोजी सकाळी सव्वासहा वाजता भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. दरवर्षी हिमालयातील या पवित्र तीर्थस्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि मंदिर समितीकडून यात्रेच्या तयारीला गती देण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0