तेहरान,
Preparation for the exam is difficult इराणमध्ये सध्या युद्धाची परिस्थिती गंभीर आहे, पण या धोक्यातील वातावरणातही लाखो युवक एका परीक्षेच्या भीतीने चिंतेत आहेत. ही परीक्षा म्हणजे 'कोंकुर', जी इराणच्या राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी अत्यंत कठीण प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेत अपयशी झाल्यास डॉक्टर किंवा अभियंता होण्याचे स्वप्न मोडते आणि थेट सैन्यात भरती होण्याची सक्ती होते. मार्च २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, इराण-इस्रायल युद्धामुळे या परीक्षेचा तणाव आणखी वाढला आहे. तरुण बंकर आणि बेसमेंटमध्ये अभ्यास करताना दिसत आहेत. 'कोंकुर' ही परीक्षा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. यात विज्ञान, फारसी साहित्य, अरबी भाषा आणि धार्मिक अभ्यास यांचा समावेश असतो. परीक्षा साडेचार तास चालते आणि यामध्ये ब्रेकसुद्धा नसतो. इराणमध्ये चांगली रँक मिळवणं युवकांसाठी भविष्य ठरवणारे असते. अपयशी झाल्यास चांगल्या करियरच्या संधी गमावल्या जातात आणि सैन्यात भरती होण्याची धोका निर्माण होतो.

इराणच्या कायद्यानुसार, १८ वर्षाच्या प्रत्येक मुलाला दीड ते दोन वर्षांची सैन्य सेवा अनिवार्य आहे. ही सेवा टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणे. त्यामुळे 'कोंकुर' ही परीक्षा युवकांसाठी सुरक्षा कवचाची भूमिका पार पाडते. पास झाल्यास शिक्षण चालू राहते, अपयशी झाल्यास सीमेवर लढाई करावी लागते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही सक्ती अधिक भयावह बनली आहे.मार्च २०२६ मध्ये तेहरान आणि इस्फहानसारख्या शहरांत बॉम्बस्फोट होत आहेत, शाळा-कॉलेज बंद आहेत. युवक लायब्ररीऐवजी बंकर आणि बेसमेंटमध्ये अभ्यास करत आहेत. इंटरनेट बंद असल्यामुळे ऑनलाइन कोचिंग देखील थांबले आहे. युद्धामुळे परीक्षा केंद्रे बंकरजवळ हलवण्याची चर्चा सुरू आहे.
इराणमध्ये 'कोंकुर' वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिला टप्पा मे-जूनमध्ये आणि मुख्य परीक्षा जुलैमध्ये असते. परंतु २०२६ मध्ये युद्धामुळे वेळापत्रकात विलंब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षण संस्थेने परीक्षा उशिरा घेण्याचे संकेत दिले आहेत. एअरस्पेस बंद असल्यामुळे केंद्र बदलण्याची चर्चा सुरु आहे. लाखो युवकांना युद्धाच्या दरम्यान अभ्यास करावा लागतो. आकाशातून मिसाईल पडत असतानाही परीक्षा तयारी सुरू ठेवावी लागते. इंटरनेट आणि शैक्षणिक सुविधा बंद असल्यामुळे तयारी अधिक कठीण झाली आहे. या परिस्थितीत युवकांच्या भविष्यावर परीक्षा आणि युद्धाचा दोन्हीचा दबाव आहे, ज्यामुळे इराणमध्ये 'कोंकुर' ही परीक्षा केवळ शिक्षणाचा मार्ग नसून जीवनाचा निर्णय ठरत आहे.