भारतीय विमानतळ क्षेत्रात १० हजार कोटींची गुंतवणूक

12 Mar 2026 18:16:10
पुणे
Pune Airport देशातील विमानतळ सेवा अधिक सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मोठ्या पातळीवर पावले उचलली आहेत. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विपीन कुमार यांच्या मते, येत्या दोन वर्षांत नेव्हिगेशन क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
 

Pune Airport, Airport Authority of India, Vipin Kumar, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार, २०४७ पर्यंत भारताला नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ‘ग्लोबल हब’ बनवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या दृष्टीने देशातील विमानतळांवरील तांत्रिक सुविधा आणि नेव्हिगेशन व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या गुंतवणुकीतून आधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर्स, प्रगत रडार यंत्रणा आणि ऑटोमेशन प्रणाली विकसित केली जाणार आहेत, ज्यामुळे विमान वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक अचूक, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल.देशातील विमानतळांच्या वाढीबाबतही प्राधिकरणाने महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळ कार्यरत होते, ती संख्या आता १६४ वर पोहोचली असून, २०२९ पर्यंत आणखी ५० नवीन विमानतळ उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरवर्षी साधारण ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला जातो, मात्र यंदा नेव्हिगेशन आणि सुरक्षा क्षेत्रावर विशेष लक्ष देत १० हजार कोटींचा निधी राखण्यात आला आहे.पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावरही काम सुरू आहे. सुमारे ३०० एकर जागेच्या मागणीसाठी राज्य सरकारशी समन्वय सुरू असून, जमीन उपलब्ध होताच विस्ताराच्या कामाला सुरुवात होईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
याव्यतिरिक्त, Pune Airport  प्रवाशांसाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेत महिला चालकांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, देशभरातील विमानतळांवर मालवाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी कार्गो प्रक्रियेत धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे विमान प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल असा विश्वास प्राधिकरण व्यक्त करत आहे.
Powered By Sangraha 9.0