पूर्ण ब्रह्म अभियानासाठी धान्यदान !

12 Mar 2026 12:49:58
नागपूर ,
Senior Citizen Foundation जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर तर्फे ‘पूर्ण ब्रह्म अभियान’ अंतर्गत समाजातील दीन-दुबळे, गरजू जेष्ठ नागरिक, अनाथ मुले व दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी धान्य संकलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या विचारांनुसार समाजातील गरजूंना सहकार्य व आधार देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांच्या आवाहनानुसार परिसरातील जेष्ठ नागरिकांनी १२० कि. गहू, ९७ कि. तांदूळ,२३ कि. तुरडाळ असे एकूण २४० कि. धान्य तसेच १५,००१ रुपये रोख रक्कम जमा करून ती डॉ. मिश्रा यांच्या स्वाधीन करण्यात आली.
 
 
dhan
 
 
याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३७ मधून निवडून आलेले चार नगरसेवक अश्विनी जिचकार, निधी तेलगोटे, प्रा. दिलीप दिवे व संजय उगले यांचा जेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. Senior Citizen Foundation कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भार्गव, सचिव दिनकरराव सुपले, सल्लागार जयंत दलाल, पांडुरंग फिस्के, उपाध्यक्ष ओंकार श्रीखंडे तसेच बावणे, चोपडे आदी उपस्थित होते.
सौजन्य:ओंकार श्रीखंडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0