गजाननलिलात श्रीराम प्रभात फेरीचे उत्स्फुर्त स्वागत

12 Mar 2026 20:05:56
वर्धा, 
स्थानिक प्राचीन श्रीराम मंदिर गोल बाजार समिती व Shri Ram Shobha Yatra श्रीराम शोभा यात्रा समितीच्या वतीने गुढीपाडव्याला पाडवा पहाट तसेच नवरात्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच माहिती प्रत्यक्ष घराघरात पोहोचावी यासाठी काढण्यात आलेल्या श्रीराम प्रभात फेरीचे बँक ऑफ इंडिया तसेच गजानन लिला रेसिडेन्सीमध्ये उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
 
 
Shobha Yatra
 
Shri Ram Shobha Yatra  श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर शोभा यात्रा समितीच्या वतीने श्रीराम नवरात्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आते. यासोबतच पाडवा पहाट हा कार्यक्रम वर्धेकरांनी डोयावर घेतला आहे. या कार्यक्रमाला जाहीर निमंत्रण देण्यासाठी धुळवळीच्या दुसर्‍या दिवसापासुन जवळपास शहरातील प्रत्येक भागात १४ दिवस सातत्याने श्रीराम प्रभात फेरी काढण्यात येते. या प्रभात फेरीत श्रीराम रथ आणि भजन मंडळीचा सहभाग असतो. १९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येते. प्रत्येक भागात प्रभात फेरीचे जंगी स्वागत केले जाते. आज गुरुवार १२ रोजी बँक ऑफ इंडिया कॉलनीतील श्रीराम मंदिरातून प्रभात फेरीला प्रारंभ झाला. बाळकृष्णनगर, रमानगर परिसरातून जात असताना गजाननलिला रेसिडेन्सी येथे रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करीत प्रभात फेरीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिराचे विश्वस्त संजीव लाभे, विजय लाभे, डॉ. चंद्रशेखर भुसारी, राम वखरे, कमल कुलधरिया, राजेंद्र उमाटे, प्रशांत बुर्ले, मधुकर जोशी, शिरीष जवदंड, राजेंद्र आचार्य, सतिश कातरकर, मनोज पाचखेडे, प्रकाश परसोडकर, अनिवृद्ध जोशी, प्रशांत गौरशेट्टीवार, सुधीर रेलकर, गिरीष हरदास, अनिरुद्ध देशमुख, मुकुंद मसराम, चंद्रकांत रोकडे, चंद्रकांत मुडे, सुरेश पट्टेवार, विनय मुलकलवार, अविनाश देशपांडे, आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता डॉ. कमलकिशोर छांगाणी, अनिल चुन्ने, रिकेत भरतकर, प्रवीण देशमुख, दिनेश खोडे, प्रकाश मांडवकर, आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0