घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य द्या

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
- उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश
अनिल कांबळे
 
नागपूर, 
सामान्य नागरिकांच्या जीवनातील प्राथमिकता ओळखून Supply of gas cylinders गॅस सिलिंडरचा पुरवठा महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषय आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारला नाेटीस बजावत 17 मार्चपर्यंत जबाब नाेंदवण्याचे निर्देशही दिले. राज्यामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी काॅनि्फडन्स पेट्राेलियम इंडिया कंपनीच्या सहा मुख्य विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर गुरुवारी न्या. अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.
 
 
high couratdksldk
 
Supply of gas cylinders  याचिकाकर्त्यामध्ये मे. ओंकार सेल्स व इतर विक्रेत्यांचा समावेश आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे साैदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, सिरिया व इतर देशांतून हाेणारा तेल पुरवठा बाधित झाला आहे. त्याचा परिणाम एलपीजी उत्पादनावर पडला आहे. घरगुती ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. त्यामुळे पेट्राेलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाने एलपीजी उत्पादन व पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश जारी केले आहेत. असे असताना काॅनि्फडन्स कंपनी घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी कंपनीला निवेदन सादर करून एलपीजी निर्यात बंद करण्याची आणि घरगुती बाजारात पुरवठा वाढवण्याची मागणी केली; मात्र कंपनीने निर्यात धाेरणाचे कारण सांगून असे करण्यास नकार दिला, असा आराेप याचिकेत करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यार्ते अ‍ॅड. देवानी यांनी युक्तिवाद केला.