मिनी मंत्रालय अर्थसंकल्पात योजनांचा ‘पाऊस’

12 Mar 2026 18:28:14
अध्यक्षस्थानी मंदार पत्की : शेतकरी व महिला केंद्रस्थानी
यवतमाळ, 
Yavatmal Zilla Parishad: Budget यवतमाळ जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाचे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे सुधारित, तसेच २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक वसंतराव नाईक सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी गुरुवार, १२ मार्च रोजी सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प ३४ कोटी ८९ हजार रुपयांचा असून, यात स्व-उत्पन्न वाढविण्यासाठी भौतिक मालमत्ता तयार करण्यावर भर देण्यात आहे. तसेच या अर्थसंकल्पात शेतकरी व महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
 
 
bajat
 
या अंतर्गत यवतमाळ शहरातील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय समोरील बाजूस दुमजली दुकान गाळे या आर्थिक वर्षात पूर्णत्वास येण्यात येणार आहे. वणी पंचायत समिती येथील मुख्य बाजारपेठेतील जागेवर दुकान गाळ्यांचे निर्माण सुरू आहे. तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेने डिजिटल गर्व्हनन्समध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. या अंतर्गत जिप संपूर्ण कामकाज ई-ऑफिस आणि डिजिटल यंत्रणेचा वापर करून पारदर्शक, सुलभ आणि गतीमान बनविण्यावर कार्य करण्यात आलेले आहे. यासाठी या आर्थिक वर्षात देखील डिजिटल सुधारणांवर काम करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा कृषीप्रधान असल्याने जिल्ह्यातील, विशेषतः अल्पभूधारक शेतकर्‍यांकडून शेतीची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्याच्या कृषी विभाग अंतर्गत २७४.२० लक्ष रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात करण्यात येत येणार आहे.
 
 
Yavatmal Zilla Parishad: Budget  त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीबरोबरच जोडधंदा सुरू करून त्यातून अधिकचे उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीकोनातून पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना यावर्षी राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय घटकांसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत अनेक योजना राबविल्या जाणार जिल्ह्यातील महिला आणि बालवर्ग यांच्यासाठी महिला व बालविकास विभागमार्फत विविध वैयक्तिक लाभांच्या योजना राबविण्यात येणार आहेत्त. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी तुकाराम भिसे, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सीमा काळे, सचिन शरदार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0