विहिरीत युवकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

12 Mar 2026 17:05:25
कारंजा लाड,
Karanja Lad तालुयातील बेंबळा परिसरातील एका विहिरीत युवकाचा हात पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार १२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव प्रणव मधुकर गुरेकर (वय २०) असे असल्याची माहिती मिळाली आहे. तो बुधवार रात्रीपासून बेपत्ता होता.
 

youth body found in well Maharashtra, Karanja Lad news 
सूत्रांच्या माहितीनुसार, बेंबळा गावातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह ओळख पटवल्यानंतर तो प्रणव मधुकर गुरेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कमारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे बेंबळा गावात शोककळा पसरली. प्रथम दर्शनी ही आत्महत्या वाटत असून, घटनेचा पुढील तपास धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार भारत लसंते करीत आहे.
Powered By Sangraha 9.0