गंभीर आरोप... ब्लॅक बॉक्स डेटा एडिट झाला

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
मुंबई
Rohit Pawar २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाले होते. या अपघाताबाबत आता नवे प्रश्न उपस्थित होत असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला असून या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
 

Ajit Pawar plane crash controversy, Rohit Pawar allegations, 
रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग काही अधिकाऱ्यांच्या मदतीने ब्लॅक बॉक्समधील महत्त्वाचा डेटा एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. ब्लॅक बॉक्समधील FDR (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) या भागात विमानाच्या तांत्रिक हालचालींची संपूर्ण नोंद असते. या डेटामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. DGCA किंवा AAIB मधील जे अधिकारी यामध्ये मदत करत असतील, त्यांनी लक्षात ठेवावे की भविष्यात होणाऱ्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा प्रकार उघड होऊ शकतो, असेही त्यांनी इशारा दिला आहे.
या प्रकरणात Rohit Pawar  संसदेच्या माध्यमातून चौकशीसाठी समिती स्थापन केली जाईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. समिती स्थापन झाल्यानंतर फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल आणि त्यावेळी सत्य समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. DGCAमध्ये अनेक प्रामाणिक अधिकारी असून त्यांनाही या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी चर्चा करण्यासाठी **Rahul Gandhi** यांनी आपल्याला सुमारे अर्धा तास वेळ दिला होता, अशी माहिती रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात पोलिसांनी आपला एफआयआर नोंदवून घेतला नाही, हे सांगितल्यावर राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि काँग्रेस पक्ष तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणात Rohit Pawar  न्याय मिळावा यासाठी आपण अमित शहा , सीबीआय तसेच DGCA अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती; मात्र विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे कदाचित अद्याप वेळ मिळालेला नसावा, असे रोहित पवार यांनी म्हटले. राज्य सरकारने अजूनही या प्रकरणी केंद्र सरकारकडे CBI चौकशीसाठी प्रस्ताव पाठवलेला नसल्याची माहिती मिळाल्याचाही त्यांनी दावा केला.अजित पवार विमान अपघातप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत असताना येत्या सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.